-
राज्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याच्या हेतूपूर्तीसाठी महाराष्ट्र सरकारने गुगलशी करार केला आहे.असा करार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.
ठळक मुद्दे
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून यात सरकारी, खासगी, अनुदानित आणि विनाअनुदानित अशा सर्व स्तरावरील १.०९ लाख संस्थांचा समावेश असेल.
-
सदर कराराचा २२.०३ दशलक्ष विद्यार्थ्यांना फायदा होईल.
-
विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना गुगल वर्ग आणि शिक्षणासाठी जी-सूटचा वापर करण्यास परवानगी मिळेल जे दूरस्थ शिक्षणास मदत करण्यासाठी उपाय प्रदान करतील.
महाराष्ट्र राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: श्री. उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
-
राज्यपाल: भगतसिंग कोश्यारी हे सध्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
स्थापना: १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती
-
विशेषता: क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील ३ रे मोठे राज्य आहे.
-
राजधानी: मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.
-
अधिकृत भाषा: मराठी ही महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा म्हणून वापरली जाते.