-
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील राजभवन येथे माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी लिहीलेल्या ‘माझी भिंत’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तक हे राजेंद्र दर्डा यांच्या अनेक निवडक विषयांवर गत ४ वर्षांत लिहिल्या गेलेल्या फेसबुक पोस्ट्सचे संकलन आहे.
-
पुस्तक प्रकाशन सोहळ्याला महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, लोकमत मीडिया ग्रुपचे अध्यक्ष विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि इतर निमंत्रकांनी आपली उपस्थिती दर्शवली.