-
मध्य प्रदेश राज्यातील छतरपूर पोलिसांमार्फत राज्यात कोरोना संक्रमणादरम्यान 'एक संकल्प-बुजुर्गो के नाम' ही मोहीम राबविण्यात येत आहे.
ठळक मुद्दे
-
'एक संकल्प-बुजुर्गो के नाम' म्हणजेच 'ज्येष्ठ आणि वृद्ध लोकांसाठीची बांधिलकी' होय.
-
जागतिक महामारी कोविड -१९ च्या काळात वृद्ध आणि घरात एकट्याने राहणाऱ्या असहाय लोकांसाठी ही मोहीम म्हणजे एक वरदान असल्याचे सिद्ध होत आहे.
-
सदर मोहिमेअंतर्गत पोलिस कर्मचारी वृद्ध लोकांची सर्व दृष्टीने अर्थात त्यांच्या अन्नापासून आरोग्यापर्यंत काळजी घेत आहेत.
-
ही मोहीम मध्य प्रदेश पोलिसांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे म्हणजेच 'देशभक्ती-जनसेवा' उद्देशाच्या अनुषंगाने कार्यरत आहे.
मध्य प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान हे सध्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
-
राज्यपाल: आनंदीबेन पटेल या सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
राज्यनिर्मिती: १ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्याची स्थापना झाली होती
-
राजधानी: भोपाळ ही सध्या मध्य प्रदेशची राजधानी आहे
-
विशेषता: मध्य प्रदेश हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे