• ऑस्ट्रेलियास्थित लोवी संस्थेमार्फत (Lowy Institute) जाहीर करण्यात आलेल्या कोरोना विषाणू प्रतिसाद निर्देशांकामधील (Covid - १९ Response Index) ९८ देशांच्या यादीमध्ये भारत ८६ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • कोविड - १९ प्रतिसादावर सार्वजनिकरित्या उपलब्ध आणि तुलनात्मक माहितीच्या आधारे देशांचे स्थान निश्चित करण्यात आले आहे.

  • लोवी संस्था ही ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथे स्थित एक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय धोरण विचार गट म्हणून प्रसिद्ध आहे.

  • सदर क्रमवारीमध्ये अनुक्रमे न्यूझीलंड, व्हिएतनाम आणि तैवान हे अव्वल ३ देश आहेत.

  • ब्राझील या यादीमध्ये तळाशी विराजमान झाला आहे.

  • अपुऱ्या माहितीच्या कारणास्तव चीनला या यादीतून वगळण्यात आले आहे.