-
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत 'लोकल - ४ दिवाली (Local4Diwali)' नावाची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
देशातील सांस्कृतिक वारसा तसेच अनेकांच्या रोजीरोटीचा स्रोत असणाऱ्या भारतीय हस्तकलेला चालना देण्यासाठी सदर मोहीम सुरू करण्यात आली आहे.
-
दिवाळीनिमित्त स्थानिक भारतीय हस्तकलेची उत्पादने खरेदी करण्यास लोकांना प्रोत्साहित करणे तसेच भारतीय हस्तकला आणि कारागीरांना चालना देणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
वस्त्रोद्योग मंत्रालयाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
केंद्रीय मंत्री: स्मृती इराणी या सध्या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.