• भारतीय चित्रपट अभिनेते ओम पुरी यांना २०२० सालच्या बोस्टन भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (India International Film Festival of Boston - IIFFB) तिसर्‍या आवृत्तीमध्ये मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या पत्नी नंदिता पुरी यांनी स्विकारला.

  • शेफ विकास खन्ना हे 'प्राईड ऑफ इंडिया अ‍ॅवॉर्ड (Pride of India Award)' पुरस्काराचे विजेते ठरले.

  • सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मल्याळम चित्रपट 'कांथी' ला जाहीर झाला.

  • 'जोसेफ: बॉर्न इन ग्रेस (Josef: Born In Grace)' मध्ये धर्मोपदेशकाची भूमिका करणाऱ्या व्हिक्टर बॅनर्जी यांना सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • सर्वोत्कृष्ट महिला अभिनेत्रीचा पुरस्कार शालजा अंबू यांना कांथी चित्रपटासाठी प्राप्त झाला.