• HDFC बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. आदित्य पुरी यांना 'युरोमनी उत्कृष्टता पुरस्कार (Euromoney Awards of Excellence) २०२०' चा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • उत्कृष्ट स्वरूपाच्या जागतिक संस्था अस्तित्त्वात नसलेल्या सध्याच्या काळात भारतात जागतिक स्तरावर ठसा उमटवणारी बँक निर्माण करण्याच्या कौशल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे.

  • युरोमनीचे उत्कृष्टतेसाठीचे पुरस्कार हे बँकांना महत्त्व देणारे महत्वपूर्ण स्वरूपाचे पुरस्कार आहेत.

  • १९९२ साली या पुरस्कारांची स्थापना झाली होती.

  • जागतिक बँकिंग क्षेत्रातील हा अशा प्रकारचा पहिलाच पुरस्कार होता.

HDFC बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र हे HDFC बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १९९४ साली HDFC बँकेची स्थापना झाली होती.

  • बँकेची टॅगलाईनः 'We Understand Your World' ही बँकेची टॅगलाईन आहे.

  • संस्थेचा प्रकार: HDFC बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या स्वरूपात कार्यरत आहे.