-
भारतीय रिझर्व्ह बॅंकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) महाराष्ट्रातील सुभद्रा स्थानिक क्षेत्र बँक लि. कोल्हापूरला देण्यात आलेला बँकिंग परवाना रद्द करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
२०१९-२० या आर्थिक वर्षात २ तिमाहींसाठी लागणार्या आवश्यक किमान निव्वळ किमतीची तोडणी करण्यात आल्याने बँकेवर सदर कारवाई करण्यात आली आहे.
-
बँकेच्या व्यवहारांचे संचालन सध्याच्या आणि भविष्यातील ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक होते असे निदर्शनास आले आहे.
-
कोस्टल स्थानिक क्षेत्र बँक लि. आणि कृष्णा भीमाँ समृध्दी लॅब लि. या फक्त २ स्थानिक क्षेत्र बँका सध्या भारतात कार्यरत आहेत.