-
पोप फ्रान्सिस यांच्या 'लेट अस ड्रीम (Let Us Dream)' नावाच्या पुस्तकाचे डिसेंबर २०२० मध्ये अनावरण करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
पोप फ्रान्सिस सदर पुस्तकाद्वारे स्पष्ट करू इच्छितात की जीवनातील संकट एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांना सामोरे जायला कसे शिकवते.
-
स्वत:च्या वैयक्तिक जीवनातल्या ३ मोठ्या संकटांचा उल्लेख त्यांनी या पुस्तकात केला आहे.
-
जगभरातील कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर पोप फ्रान्सिस आणि त्यांचे चरित्रकार ऑस्टन इव्हरेघ यांच्यात पुष्कळशी देवाणघेवाण होऊन सदर पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
-
ऑस्टेन इव्हरेघ हे एक रोमन कॅथोलिक जर्नलिस्ट व लेखक आहेत.
-
सायमन अँड शस्टर यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले असून ते इंग्रजी तसेच स्पॅनिश भाषांमध्ये एकाच वेळी प्रकाशित केले जाईल अशी योजना आहे.