• मध्य प्रदेश सरकारमार्फत मुला-मुलींसाठी ‘लाँच पॅड योजना (Launch Pad Scheme)’ सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • युवकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या मुख्य उद्देशाने राज्यातील महिला व बालविकास विभागामार्फत सदर योजना सुरू करण्यात आली आहे.

  • सदर योजनेच्या माध्यमातून शिक्षण व प्रशिक्षण सुरू ठेवून मुले स्वावलंबी होऊ शकतील अशी अपेक्षा आहे.

मध्य प्रदेश बाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान हे सध्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: आनंदीबेन पटेल सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राज्यनिर्मिती वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: भोपाळ ही सध्या मध्य प्रदेशची राजधानी आहे.

  • राज्याची विशेषता: मध्य प्रदेश हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.