-
ओडीशा राज्यातील रूरकेला शहरामध्ये भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडीयम उभारले जाणार असल्याचे ओडीशाचे मुख्यमंत्री श्री. नवीन पटनाईक यांच्यामार्फत जाहीर करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
रूरकेला येथील बीजू पटनाईक तंत्रज्ञान विद्यापीठात सदर स्टेडियम उभारण्यात येणार आहे.
-
१५ एकर क्षेत्रात पसरलेल्या या स्टेडियमची आसन क्षमता २०००० इतकी असेल.