• अरुणाचल प्रदेशातील चुल्लू या आदिवासी गावात खादी व ग्रामोद्योग आयोगामार्फत (Khadi and Village Industries Commission - KVIC) रेशीम प्रशिक्षण तथा उत्पादन केंद्र सुरु करण्यात येणार आहे. सदर केंद्र राज्यातील पहिले रेशीम प्रशिक्षण तथा उत्पादन केंद्र असेल.

ठळक मुद्दे

  • प्रशिक्षण तथा उत्पादन केंद्रात हातमाग, चरखा आणि रेशीम रीलिंग मशीन यांसारखी यंत्रे बसवली जातील.

  • KVIC ने एरी रेशीमच्या प्रशिक्षण सह उत्पादन केंद्राच्या जागेकरिता जीर्ण झालेल्या शाळेच्या इमारतीचे रूपांतर केले तसेच प्रशिक्षण सुरू करण्यासाठी चुल्लू गावातील २५ स्थानिक कारागीरांची पहिल्या तुकडीची निवडही केली.

खादी व ग्रामोद्योग आयोगाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • आयोगाचे अध्यक्ष: विनय कुमार सक्सेना हे सध्या आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.

  • स्थापना वर्ष: १९५६ साली खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे खादी व ग्रामोद्योग आयोगाचे मुख्यालय आहे.

  • आयोगाचे उद्दिष्ट: खादी व ग्रामोद्योगांची स्थापना व विकास करण्यासाठी योजना, प्रोत्साहन, सुविधा, आयोजन व सहाय्य करणे हे खादी व ग्रामोद्योग आयोगाचे उद्दिष्ट आहे.