-
कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री श्री. बी. एस. येडियुरप्पा यांच्या हस्ते नुकताच ४० कृषी संजीवनी व्हॅन्सना (Krishi Sanjeevani Vans) हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर कृषी उपक्रम राबविण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत (National Krishi Vikas Yojana) केंद्राच्या सहाय्याने राज्याच्या कृषी विभागामार्फत या व्हॅन्सचे अनावरण करण्यात आले आहे.
कर्नाटक राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: बी. एस. येडियुरप्पा हे सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत.
-
राज्यपाल: वजुभाई वाला हे सध्या कर्नाटकच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
राज्य स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची स्थापना झाली होती.
-
राजधानी शहर: बंगळुरू ही कर्नाटकची राजधानी आहे.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने कर्नाटक देशात ६ व्या स्थानावर आहे.