• कोटक महिंद्रा बँकेने कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या जगभरातील रोगराईच्या पार्श्वभूमीवर आपल्या ग्राहकांमध्ये आशा आणि आशावाद निर्माण करण्यासाठी ‘कोना कोना उम्मीद’ नावाची २ महिने कालावधीची मोहीम मोठ्या प्रमाणात सूट देऊन सुरू करण्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्दे

  • कर्ज, बचत खाती, चालू खाती, कॉर्पोरेट पगाराची खाती तसेच कोटक डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड आणि डिजीटल पेमेंट्स यासह बँक आपल्या उत्पादनांवर अनेक ऑफर देईल

  • कोटक यांच्याकडून आपल्या ग्राहकांना शॉपिंग, अत्यावश्यक वस्तू, वैयक्तिक काळजी, शिक्षण, फिटनेस, आरोग्य आणि निरोगीपणा, करमणूक, सायबर केअर आणि सुरक्षा यासारख्या श्रेणींमध्ये विशेष सूट देण्यासाठी १०० हून अधिक ब्रँडशी करार करण्यात आला आहे

'कोटक महिंद्रा बँके' बाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापनाः २००३ साली कोटक महिंद्रा बँकेची स्थापना झाली होती

  • मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र येथे बँकेचे मुख्यालय आहे

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: उदय कोटक यांच्यावर बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी आहे

  • बँक टॅगलाइन: 'Lets make money simple' ही बँकेची टॅगलाइन आहे