• मुंबई-आधारित संशोधन संस्था 'इंडिया मायग्रेशन नाऊ (India Migration Now)' मार्फत नुकताच 'आंतरराज्यीय स्थलांतर धोरण निर्देशांक (Interstate Migrant Policy Index - IMPEX)' जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर निर्देशांकाद्वारे आंतरराज्यीय स्थलांतरितांचे एकत्रिकरण करण्याचे कार्य दर्शवण्यात येते.

  • भारताचा सरासरी IMPEX स्कोअर १०० पैकी ३७ आहे.

  • केरळ, गोवा, राजस्थान आणि आंध्र प्रदेश ही राज्ये प्रस्तावित निर्देशांकानुसार स्थलांतरित कामगारांना एकत्रित करण्याच्या कार्यात सर्वात यशस्वी ठरली आहेत.

  • देशातील सर्वात कमी आंतरराज्यीय स्थलांतर धोरण निर्देशांक दिल्लीसाठी आहे.

  • देशात २०११ च्या जनगणनेनुसार ४५५ दशलक्ष अंतर्गत स्थलांतरित आहेत.