-
केरळमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टपूर्तीच्या (United Nations Sustainable Development Goals) दृष्टीने पहिले आंतरराष्ट्रीय महिला व्यापार केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. भारतात स्थापन होणारे अशा प्रकारचे हे पहिलेच केंद्र आहे.
ठळक मुद्दे
-
सदर केंद्रामार्फत महिला उद्योजकतेला गती देण्याचे कार्य पार पाडण्यात येईल अशी अपेक्षा आहे.
-
महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी, त्याच्या विस्तारासाठी आणि आपली उत्पादने जागतिक स्तरावर बाजारात उपलब्ध करून देण्यासाठी याच्यामार्फत घरापासून दूर एक सुरक्षित स्थान प्रदान करण्यात येईल.
-
महिला व्यापार केंद्राद्वारे महिला उद्योजकांना आंतरराष्ट्रीय व्यापारात भाग घेण्यास सक्षमता प्राप्त करता येईल, स्पर्धात्मकता वाढवता येईल आणि मोठ्या आर्थिक लाभांचा आनंदही घेता घेईल.
-
आंतरराष्ट्रीय महिला व्यापार केंद्र महिलांकरिता संगीत, नृत्य आणि नाटक यांसारख्या कला आणि सांस्कृतिक प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी जागा प्रदान करेल.
केरळ राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्याचा दर्जा प्राप्त वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी केरळला राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता.
-
राजधानी: तिरुवनंतपूरम ही केरळ राज्याची सध्याची राजधानी आहे.
-
राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान हे केरळच्या राज्यपाल पदावर आहेत.
-
मुख्यमंत्री: पिनारायी विजयन हे सध्या केरळच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.