• भुवनेश्वर येथील अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेने (All India Institutes of Medical Sciences - AIIMS) तिसऱ्यांदा 'कायाकल्प पुरस्कार (Kayakalp Award)' जिंकला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुरस्कार जिंकून स्वच्छता तसेच सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये शाश्वतता निर्माण करण्यासाठी AIIMS भुवनेश्वरने आपले कौशल्य सिद्ध केले आहे.

  • या उल्लेखनीय कामगिरीसाठी संस्थेला २ कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

  • स्वच्छतेसाठी सलग तिसर्‍या वर्षी सदर संस्थेला 'ब' श्रेणीतील सर्वोत्तम केंद्रीय शासकीय रुग्णालय म्हणून गौरविण्यात आले आहे.

  • यापूर्वी २०१८ तसेच २०१९ मध्ये 'ब' श्रेणीतील देशातील दुसरे सर्वात स्वच्छ रुग्णालय म्हणून संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.