-
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांच्या हस्ते 'कपिला (KAPILA)' कलाम नावाच्या कार्यक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ८९ व्या जन्मतिथीनिमित्त बौद्धिक संपदा साक्षरता आणि जागरुकता अभियानासाठी 'कपिला कलाम (Kalam Program for Intellectual Property Literacy and Awareness campaign)' नावाच्या मोहीमेचे व्हर्च्युअली अनावरण करण्यात आले आहे.
-
भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी सदर मोहिमेअंतर्गत सरकार शैक्षणिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आविष्काराच्या पेटंटविषयी जनजागृती करेल अशी अपेक्षा आहे.
-
बौद्धिक संपदा क्षेत्रामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने १५ ते २३ ऑक्टोबर हा सप्ताह मंत्रालयामार्फत ‘बौद्धिक संपदा साक्षरता सप्ताह (Intellectual Property Literacy Week)’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.