• समकालीन आधुनिक भारतातील सर्वोत्कृष्ट कल्पित (Non-fiction) पुस्तकासाठी 'कमलादेवी चट्टोपाध्याय न्यू इंडिया फाउंडेशन बुक पुरस्कार (Kamaladevi Chattopadhyay New India Foundation Book Prize) २०२०' च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • अमित आहूजा यांच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीद्वारे प्रकाशित 'मोबिलायझिंग दी मार्जिनलीज्ड: इथनिक मूव्हमेंट्स पार्टिज विदाउट इथनिक मूव्हमेंट्स (Mobilizing the Marginalized: Ethnic Parties without Ethnic Movements)' आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांना त्यांच्या पेंग्विन रँडम हाऊसद्वारे प्रकाशित 'ए चेकर्ड ब्रिलियन्स: द मेनी लाईव्ज ऑफ व्ही के कृष्णमेनन (A Chequered Brilliance: The Many Lives of VK Krishna Menon)' साठी संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आला आहे. 

  • सन्मानपत्र आणि १५ लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप असून तो आता २ लेखकांमध्ये विभागण्यात येणार आहे.