• आंध्र प्रदेशचे राज्यपाल श्री. विश्वभूषण हरीचंदन यांना २०२१ साठीचा 'कलिंग रत्न सन्मान (Kalinga Ratna Samman)' प्रदान करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • सरला भवन येथे सरला साहित्य संसदेच्या ४० व्या वार्षिक दिवसाच्या निमित्ताने उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी विश्वभूषण यांना सन्मानित केले आहे.

  • कलिंगरत्न सन्मानामध्ये देवी सरस्वतीची चांदीची मूर्ती, एक तांब्याचा फलक आणि एक शाल समाविष्ट आहे.

आंध्र प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली होती.

  • राज्यपाल: विश्वभूषण हरीचंदन हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यमंत्री: वाय. एस. जगनमोहन रेड्डी हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने आंध्र प्रदेश राज्य देशात ७ व्या क्रमांकावर आहे.