• केंद्रीय मंत्री श्री. जितेंद्रसिंग यांच्या हस्ते डॉ. अशोक के. वैद यांनी संपादित केलेल्या 'Gastric Cancer' नावाच्या कर्करोगावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • ऑन्कोलॉजी (Oncology) विषयावरील ३ दिवसीय आभासी परिषदेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष सत्रात सदर पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले.

  • स्प्रिंगर हेल्थकेअर एज्युकेशनमार्फत (Springer Healthcare Education) हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

  • श्री. अशोक के. वैद हे प्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट (Oncologist) आहेत.

  • वैद यांना त्यांनी औषध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल २००९ सालामध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.