-
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचा सन्मान करण्यासाठी ७ ऑगस्ट हा 'भाला फेक दिवस (Javelin Throw Day)' म्हणून साजरा करण्याचा निर्णय 'भारतीय अॅथलेटिक्स महासंघामार्फत (Athletics Federation of India)' घेण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
२३ वर्षीय नीरज चोप्रा हा अभिनव बिंद्रा नंतर भारताचा दुसरा वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता ठरला आहे.
-
७ ऑगस्ट २०२१ रोजी 'टोकियो ऑलिम्पिक २०२०' च्या भालाफेक स्पर्धेत त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
-
सदर दिवसाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय अॅथलेटिक्स महासंघाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
अध्यक्ष: आदिले जे. सुमरीवाला हे सध्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १९४६ साली भारतीय अॅथलेटिक्स महासंघाची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे सदर संस्थेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.