• माजी केंद्रीय मंत्री पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या श्री. जसवंत सिंग यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • जसवंत सिंग यांचा जन्म १९३८ साली राजस्थानमध्ये झाला होता.

  • तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात परराष्ट्र व्यवहार मंत्री, संरक्षणमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांनी पदभार सांभाळला होता.

  • भारतीय जनता पक्षाबरोबर राजकारणात आपले बस्तान बसवण्यापूर्वी श्री. सिंग यांनी भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून भूमिका बजावली आहे.

  • जसवंत सिंग २००९ मध्ये लोकसभेवर निवडून आले होते.

  • २००९ सालामध्ये त्यांचे ‘जिन्ना: इंडिया, पार्टीशन, इंडिपेडन्स (Jinnah: India, Partition, Independence)’ हे पुस्तक, ज्यात त्यांनी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचे कौतुक केले होते ते प्रकाशित झाल्यानंतर त्यांना भाजपमधून काढून टाकण्यात आले होते .