-
'आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेमार्फत (International Telecommunication Union - ITU)' नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक (Global Cybersecurity Index)' २०२० मध्ये भारत जागतिक स्तरावर १० व्या स्थानावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे
-
वार्षिक निर्देशांक अहवालाची २०२० ची ही चौथी आवृत्ती असून यामध्ये १९४ देशांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.
-
सदर अहवाल जागतिक पातळीवर सायबर सुरक्षेबाबतच्या देशांच्या बांधिलकीचे मापन करण्याचे कार्य करतो.
जागतिक स्तर क्रमवारी
-
१. अमेरिका
-
२. युनायटेड किंगडम आणि सौदी अरेबिया
-
३. एस्टोनिया
-
१०. भारत