-
हैदराबादच्या नेहरू प्राणीशास्त्र पार्कला (Nehru Zoological Park) मानक कार्यपद्धतीसाठी ISO ९००१ : २०१५ गुणवत्ता व्यवस्थापन मानक प्रमाणपत्र (Quality Management Standards Certification) प्रदान करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
ISO ९००१ : २०१५ गुणवत्ता व्यवस्थापन मानक प्रमाणपत्र प्राप्त करणारे हैदराबाद प्राणीसंग्रहालय हे देशातील पहिले प्राणीसंग्रहालय बनले आहे.
-
तेलंगणाचे वनमंत्री श्री. ए. इंद्र करण रेड्डी यांच्यामार्फत हे प्रमाणपत्र सादर करण्यात आले होते.
-
ASCB (यूके) तर्फे नुकतेच ISO प्रमाणपत्रांसाठी प्राणीसंग्रहालयांचे मूल्यांकन करताना स्वच्छता, अन्न प्रक्रिया, पशुसंवर्धन इ. क्षेत्रात नेहरू प्राणीशास्त्र पार्कमध्ये पाळल्या जाणार्या मानदंडांबद्दल समाधान व आनंद व्यक्त करण्यात आला आहे.
तेलंगणाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: के. चंद्रशेखर राव हे सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
-
राज्यपाल: तामिळसाई सौंदाराजन हे सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
-
स्थापना वर्ष: २ जून २०१४ रोजी तेलंगणा राज्याची स्थापना करण्यात आली होती. २ जून हा 'तेलंगणा दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो.
-
राजधानीचे ठिकाण: हैद्राबाद हे तेलंगणाच्या राजधानीचे ठिकाण आहे.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने तेलंगणा हे देशात ११ व्या स्थानावर विराजमान आहे.