• बांगलादेशच्या सादत रेहमान याला 'आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्कार (International Children’s Peace Prize) २०२०' ने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सायबर धमकावण्यापासून रोखण्यासाठी आपल्या सामाजिक संस्थेच्या सहभागाबद्दल आणि ‘सायबर टीन्स (Cyber Teens)’ नावाचे मोबाईल अ‍ॅप विकसित करण्याबद्दल त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

  • शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या मलाला यूसुफझाईमार्फत नेदरलँड्समध्ये आयोजित एका समारंभात हा पुरस्कार १७ वर्षीय सादत रेहमान याला प्रदान करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्काराबाबत महत्वपूर्ण माहिती

  • सदर पुरस्कार २००५ सालापासून नेदरलँड्सच्या अ‍ॅमस्टरडॅममधील आंतरराष्ट्रीय मुलांची हक्क संस्था किड्सराईट्समार्फत (KidsRights) प्रदान करण्यात येतो.

  • मुलांच्या हक्कांसाठी तसेच असुरक्षित मुलांची परिस्थिती सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करणार्‍या मुलांना प्रतिवर्षी सदर पुरस्कार देण्यात येतो.