-
डच लेखिका मेरीके लुकास रिजनेव्हल्डने आपल्या पहिल्याच ‘द डिसकंफर्ट ऑफ इव्हिनिंग (The Discomfort of Evening)’ या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२० जिंकला आहे. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी हा पुरस्कार जिंकणारी रिजनेव्हल्ड सर्वात तरुण लेखिका ठरली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तक प्रथम डच भाषेत २०१८ सालामध्ये प्रकाशित करण्यात आले होते आणि शेवटी मिशेल हचिसन यांच्याकडून ते इंग्रजीत अनुवादित करण्यात आले होते.
-
६६००० डॉलर्सचे या पुरस्कारासाठीचे पारितोषिक लेखक आणि अनुवादक या दोघांच्याही कामाची दखल घेण्यासाठी त्यांच्यात समान प्रमाणात विभागले जाईल.
आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराबाबत महत्वपूर्ण माहिती
-
प्रथम पुरस्काराचे वर्ष: २००५ साली पहिल्यांदा बुकर पुरस्कार देण्यात आला होता.
-
पुरस्काराचे स्वरूप: हा एक आंतरराष्ट्रीय साहित्यिक पुरस्कार असून तो इंग्रजीमध्ये अनुवादित करण्यात आलेल्या पुस्तकाला दरवर्षी दिला जातो. तसेच यूके किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित करण्यात येतो.
-
पुरस्काराचे मुख्य उद्दिष्ट: जगभरातून तयार होणाऱ्या दर्जेदार कल्पित कथांचे प्रकाशन करणे आणि वाचनासाठी प्रोत्साहित करणे तसेच अनुवादकांच्या कार्यास प्रोत्साहन देणे हे या पुरस्काराचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
पुरस्कार पात्रता निकष: सदर पुरस्कारासाठी कादंबर्या आणि लघुकथा संग्रह दोन्ही पात्र आहेत.
-
पुरस्काराचे प्रायोजकत्व: बुकर पुरस्कार क्रॅन्कस्टार्ट या धर्मादाय संस्थेमार्फत प्रायोजित करण्यात येतो.