-
उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री श्री. त्रिवेंद्रसिंग रावत यांच्या हस्ते नाबार्डच्या सहयोगाने राज्यात एकात्मिक मॉडेल कृषी ग्राम योजनेचे अर्थात एकिकृत आदर्श कृषी ग्राम योजनेचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने राज्याचे कृषीमंत्री सुबोध उनियाळ यांनी कृषी व ग्रामीण विकास बँकेचे (National Bank for Agriculture and Rural Development - NABARD) अध्यक्ष जी. आर. चिंताला यांना यांत्रिकीकृत शेतीकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले.
-
एकात्मिक मॉडेल कृषी ग्राम योजना ही संकल्पना शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा आहे.
उत्तराखंड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: ९ नोव्हेंबर २००० साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली होती.
-
मुख्यमंत्री: त्रिवेन्द्रसिंग रावत हे सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
-
राज्यपाल: बेबी राणी मौर्य सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
राजधानी: उत्तराखंड राज्याच्या गैरसैंण (उन्हाळी) आणि देहरादून (हिवाळी) अशा २ राजधान्या आहेत.