• लिजो जोस पेलिसेरी दिग्दर्शित मल्याळम चित्रपट 'जल्लीकट्टू (Jallikattu)' ची ९३ व्या अकादमी पुरस्कारासाठी 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म (Best International Feature Film)' प्रकारात भारतामार्फत अधिकृत निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • जल्लीकट्टू हा १९९७ सालच्या 'गुरू' आणि २०११ सालच्या 'अडमिंटे मकन अबू' नंतर ऑस्करसाठी अधिकृत प्रवेश म्हणून निवडण्यात आलेला देशातील तिसरा मल्याळम चित्रपट आहे.

  • टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Toronto International Film Festival) जल्लीकट्टूचा प्रीमियर संपन्न झाला आणि त्याला समीक्षकांकडून कौतुकाची थाप प्राप्त झाली.

  • यानंतर बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Busan International Film Festival) आणि इतर प्रमुख ठिकाणी सदर चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.

  • २०१९ मध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असणारा झोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय' या चित्रपटाची ऑस्करसाठी भारताकडून निवड करण्यात आली होती.