• भारतीय  पत निर्देशांक संस्था असणाऱ्या केअर रेटिंग्जमार्फत (CARE ratings) आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी भारताचा GDP दर ८-८.२% दरम्यान घटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • सध्या व्यक्त करण्यात आलेला दर हा त्याच्या पूर्वीच्या अंदाजापेक्षा जास्त आहे.

  • GDP च्या वाढीमध्ये सुमारे ८ टक्क्यांची घट देखील सकल निश्चित भांडवलाच्या निर्मितीतील घटाशी निगडित असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

केअर रेटिंग्स (CARE ratings) बाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १९९३ साली केअर रेटिंग्स संस्थेची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे संस्थेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: अजय महाजन हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.