• फिच रेटिंग्ज या पत मानांकन संस्थेच्या संलग्न संस्थेने अर्थात फिच सोल्यूशन्समार्फत (Fitch Solutions) आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी भारताचा GDP दर -८.६% राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये भारताचा GDP दर ८.६% ने कमी होईल असा अंदाज फिच सोल्यूशन्समार्फत व्यक्त करण्यात आला आहे.

  • यापूर्वी हा अंदाजित दर -४.५% इतका होता.

  • संस्थेमार्फत २०२१ आणि २०२२ मध्ये ५% वार्षिक वाढीचा अंदाजदेखील वर्तविण्यात आला आहे.

फिच सोल्यूशन्सबाबत (Fitch Solutions) महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: २००८ साली फिच सोल्यूशन्सची स्थापना झाली होती.

  • मूळ पालक संघटना: फिच रेटिंग्ज ही फिच सोल्यूशन्सची पालक संघटना म्हणून कार्य बजावते.