• क्रिसिलमार्फत आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी भारताचा जीडीपी दर -९% राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे आणि भारत सरकारकडून पुरेसे आर्थिक पाठबळ पुरवले गेले नसल्यामुळे क्रिसिलने आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी आपला अंदाजित GDP दर ५ टक्क्यांवरून खाली आणला आहे.

  • आर्थिक वर्ष २०२२ साठी क्रिसिलने भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज १०% इतका व्यक्त केला आहे.

क्रिसिलबाबत (Crisil) महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: CRISIL म्हणजेच पूर्वी ओळखली जाणारी Credit Rating Information Services of India Limited अर्थात पत निर्देशांक माहिती सेवा देणारी संस्था होय.

  • स्थापना वर्ष: १९८७ साली Crisil ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे Crisil च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अंतरिम मुख्य वित्त अधिकारी: अनुराग शुक्ला हे सध्या या पदावर विराजमान आहेत.

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: आशु सुयश हे सध्या या पदावर आहेत.