• आर्थिक सहकार आणि विकास संघटनेमार्फत (Organisation for Economic Cooperation and Development - OECD) अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे की आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था १०.२ टक्क्यांनी घटेल.

ठळक मुद्दे

  • जून महिन्यामध्ये सदर GDP दर अंदाज १६.७% इतका वर्तविण्यात आला होता.

  • आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी भारताचा अंदाजित GDP दर १०.७% इतका असेल अशी OECD मार्फत अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

OECD बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: OECD म्हणजेच Organisation for Economic Cooperation and Development अर्थात आर्थिक सहकार आणि विकास संघटना होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे OECD च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १६ एप्रिल १९४८ मध्ये सुरुवातीला OEEC म्हणून याची स्थापना झाली होती. १९६१ मध्ये OECD नावाने त्याची पुनर्रचना करण्यात आली होती.

  • सरचिटणीस: जोस एंजेल गुरिया हे सध्या OECD चे सरचिटणीस आहेत.