• पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडिया जवळील स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि अहमदाबाद मधील साबरमती रिव्हरफ्रंट दरम्यान देशातील पहिल्या समुद्री विमान सेवेचे अनावरण केले आहे.

ठळक मुद्दे

  • १९ आसनी समुद्री विमान हे खाजगी विमान कंपनी स्पाइसजेटद्वारे (SpiceJet) व्यवस्थापित करण्यात येईल.

  • सदर सेवेद्वारे साबरमती ते केवडिया दरम्यानचे २०० कि.मी. अंतर केवळ ४५ मिनिटांत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

  • तिकिटांची किंमत प्रत्येकासाठी ४८०० रुपये इतकी आहे.