-
कर्नाटक राज्यातील म्हैसूरच्या अशोकपुरम येथील अरण्यभवनात भारतातील पहिले चंदन संग्रहालय उभारले जात आहे.
ठळक मुद्दे
-
चंदन वृक्षाच्या लागवडीचे महत्त्व पटवून देत शेतकर्यांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक वनविभागामार्फत हे संग्रहालय उभारले जात आहे.
-
सदरचे संग्रहालय तांत्रिक सहाय्य, रोप उपलब्धता, विपणन सुविधा, कीटक नियंत्रण उपाय तसेच चंदन उत्पादकांबाबतच्या शासकीय योजना याबाबत माहिती पुरवेल अशी अपेक्षा आहे.
कर्नाटक राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: बी. एस. येडियुरप्पा हे सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत.
-
राज्यपाल: वजुभाई वाला हे सध्या कर्नाटकच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
राज्य स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची स्थापना झाली होती.
-
राजधानी शहर: बंगळुरू ही कर्नाटकची राजधानी आहे.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने कर्नाटक देशात ६ व्या स्थानावर आहे.