• कृषी मंत्रालयामार्फत लक्षद्वीप हा १०० टक्के सेंद्रिय होणारा भारताचा पहिला केंद्र शासित प्रदेश ठरला असल्याचे घोषित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • केंद्रशासित प्रदेशातील सर्व शेतीविषयक क्रिया या कृत्रिम खते आणि कीटकनाशकांच्या वापराशिवाय करण्यात येतात.

  • याद्वारे सुरक्षित अन्न निवड आणि शेतीस अधिक पर्यावरण अनुकूल क्रिया घडवून आणण्यात येते.

  • लक्षद्वीप हे सिक्कीम या भारतातील पहिल्या पूर्णपणे सेंद्रिय घोषित केल्या जाणाऱ्या राज्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर विराजमान झाले आहे.

लक्षद्वीप बेटाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • भौगलिक वैशिष्ट्य: सदर प्रदेश हा भारताच्या ३६ बेटांमधील सर्वात छोटा केंद्र शासित प्रदेश आहे.

  • राजधानी: कवरत्ती ही लक्षद्वीपची राजधानी आहे.

  • सध्याचे प्रशासक: प्रफुल पटेल यांनी सध्या लक्षद्वीप बेटाचा कार्यभार स्वीकारला आहे.