-
उत्तर प्रदेशमधील शिवालिक मर्केंटाईल सहकारी बँक (Shivalik Mercantile Co-operative Bank - SMCB) ही लघु वित्त बँक (Small Finance Bank - SFB) म्हणून कार्यरत राहण्यास RBI कडून परवाना मिळवणारी भारतातील पहिली नागरी सहकारी बँक बनली आहे.
ठळक मुद्दे
-
SMCB ला भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत वाणिज्यिक बँकिंग परवाना मिळाला आहे.
-
शिवालिक स्मॉल फायनान्स बँक (Shivalik Small Finance Bank - SSFB) एप्रिल २०२१ पासून बॅंकिंग कामकाज सुरू करेल अशी अपेक्षा आहे.