-
भारतीय रेल्वेमार्फत कोविड-१९ बाधित रुग्णांना अन्न आणि औषधपुरवठा करण्याच्या दृष्टीने मदत करण्यासाठी 'मेडबॉट (MEDBOT)' नावाची रिमोट कंट्रोल्ड मेडिकल ट्रॉली विकसित करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
कोरोना महामारी संकटाच्या काळात लोकांना वाहतूक आणि अन्नधान्यासारख्या सुविधा पुरविण्याबरोबरच भारतीय रेल्वेमार्फत कोविड-१९ बाधित रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
-
भारतीय रेल्वेच्या डिझेल रेल इंजिन फॅक्टरीच्या (Diesel Rail Engine Factory) केंद्रीय हॉस्पिटलमध्ये ही सेवा पुरविण्यात येत आहे.
भारतीय रेल्वेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: ८ मे १८४५ रोजी भारतीय रेल्वेची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे भारतीय रेल्वेचे मुख्यालय आहे.
-
रेल्वेमंत्री: पीयूष गोयल हे सध्या रेल्वेमंत्री म्हणून कार्यरत आहेत.
-
रेल्वे राज्यमंत्री: सुरेश अंगडी हे सध्या रेल्वे राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.
-
रेल्वे बोर्ड अध्यक्ष: विनोदकुमार यादव हे सध्या रेल्वे बोर्ड अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
-
विभागणी: १८ झोनमध्ये भारतीय रेल्वेची विभागणी करण्यात आली आहे.