• केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांच्यामार्फत ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि गायक विश्वजित चॅटर्जी यांना ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ दी इयर (Indian Personality of the Year)’ पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • या ८४ वर्षीय अभिनेत्याने 'बीस साल बाद', 'नाईट इन लंडन' तसेच 'एप्रिल फूल' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • चॅटर्जी यांनी १९५० च्या उत्तरार्धात आपल्या कारकिर्दीची सुरूवात करत 'बिवी और मकान', 'सगाई', 'कोहरा' अशा विविध चित्रपटांमध्ये काम केले.

  • १९७५ मध्ये त्यांनी धर्मेंद्र, हेमा मालिनी आणि रेखा यांच्यासह 'कहते है मुझको राजा' चित्रपट दिग्दर्शित केला होता.