-
दिल्ली येथील पर्यावरणीय संस्था 'लीगल इनिशिएटिव्ह फॉर फॉरेस्ट अँड एन्व्हायर्नमेंट (Legal Initiative for Forest and Environment - LIFE)' ला २०२१ सालचा 'राईट लाईव्हलीहूड पुरस्कार (Right Livelihood Award)' जाहीर करण्यात आला आहे
ठळक मुद्दे
-
सदरचा आंतरराष्ट्रीय सन्मान हा 'स्वीडनचा पर्यायी नोबेल पुरस्कार (Sweden’s alternative Nobel Prize)' म्हणूनही ओळखला जातो.
-
१९८० मध्ये जर्मन-स्वीडिश समाजसेवी जॅकोब वॉन उक्सकुल यांनी या पुरस्काराची स्थापना केली होती.
इतर पुरस्कार विजेते
-
मार्थे वांडो (महिला हक्क कार्यकर्ते, कॅमेरून)
-
व्लादिमीर स्लिव्ह्याक (पर्यावरण कार्यकर्ते, रशिया)
-
फ्रेडा ह्यूसन (स्वदेशी हक्क रक्षक, कॅनडा)