-
आर्थिक वर्ष २०२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ११% ने वाढण्याचा अंदाज CRISIL मार्फत व्यक्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
कोविड - १९ ची वक्रता कमी होणे, लसीकरण आणि गुंतवणूकीवर केंद्रित सरकारी खर्च एकत्रित करणे या बाबींमुळे सदर वाढ अपेक्षित आहे.
क्रिसिलबाबत (CRISIL) महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: CRISIL म्हणजेच पूर्वी ओळखली जाणारी Credit Rating Information Services of India Limited अर्थात पत निर्देशांक माहिती सेवा देणारी संस्था होय.
-
स्थापना वर्ष: १९८७ साली CRISIL ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे CRISIL च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
अंतरिम मुख्य वित्त अधिकारी: अनुराग शुक्ला हे सध्या या पदावर विराजमान आहेत.
-
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: आशु सुयश हे सध्या या पदावर आहेत.