-
भारतीय नौदल आणि इंडोनेशिया नौसेना यांच्यादरम्यान भारत - इंडोनेशिया समन्वयित पेट्रोल (India-Indonesia Coordinated Patrol - IND-INDO CORPAT) ची ३५ वी आवृत्ती नुकतीच पार पडली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर ३५ व्या सराव आवृत्तीमुळे आंतर-एकत्रीकरणाच्या भारतीय नौदलाच्या प्रयत्नांना हातभार लागेल अशी अपेक्षा आहे.
-
इंडो - पॅसिफिकमध्ये मैत्रीचे मजबूत बंध निर्माण करण्याचे कार्य सदर सरावामुळे साध्य होईल अशी अपेक्षा आहे.
भारतीय नौदलाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
नौदल प्रमुख: अॅडमिरल करंबीर सिंग सध्या नौदल प्रमुख पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १६१२ साली भारतीय नौदलाची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे भारतीय नौदलाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
ब्रीदवाक्य: 'शं नो वरुणः' हे नौदलाचे ब्रीदवाक्य आहे.
-
नौदल दिन: दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्यात येतो.