-
तमिळनाडू राज्यामध्ये युवा वकील कल्याण निधीचे (Young Advocates Welfare Fund) नुकतेच अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
नव्या उमेदवारांना सुरुवातीच्या आव्हानांचा सामना करण्यास मदत करणे हे सदर योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
कायदा विद्यालयामधून बाहेर पडलेल्या वकीलांना २ वर्षांसाठी प्रत्येकी ३ हजार रुपये मासिक आर्थिक सहाय्य दिले जाईल अशी तरतूद सदर योजनेत करण्यात आली आहे.
तमिळनाडू राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: एडप्पडी के. पलनीस्वामी हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
राज्यपाल: बनवारीलाल पुरोहित हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
राजधानी: चेन्नई ही तमिळनाडू राज्याची राजधानी आहे.
-
स्थापना वर्ष: २६ जानेवारी १९५० रोजी तमिळनाडू राज्याची स्थापना झाली होती.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने तमिळनाडू देशात १० व्या क्रमांकावर आहे.