• 'भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (International Film Festival of India - IFFI)' ५२ वी आवृत्ती गोवा येथे आयोजित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • २० ते २८ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

  • सदर महोत्सव नियम व पोस्टरचे अनावरण केंद्रीय मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

  • भारतीय सिनेमातील महान व्यक्तिमत्व असणाऱ्या श्री. सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या वर्षापासून 'सत्यजित रे लाईफटाईम अचिव्हमेंट अ‍ॅवॉर्ड फॉर एक्सलन्स इन सिनेमा (Satyajit Ray Lifetime Achievement Award for Excellence in Cinema)' नावाच्या पुरस्काराचे अनावरण करण्यात आले.