-
आशियातील पहिली सौर ऊर्जा सक्षम टेक्सटाईल मिल (Solar Power-enabled Textile Mill) महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात उभारली जाणार आहे.
ठळक मुद्दे
-
जवळपास ३० एकर क्षेत्रात पसरलेली 'जय भवानी महिला सहकारी वस्त्रोद्योग मिल' ही संपूर्णपणे सौर ऊर्जेवर कार्यरत असणारी आशिया खंडातील पहिली मिल असेल.
-
सदर मिलसाठी प्रकल्प उभारणीचा एकूण खर्च सुमारे १०० कोटी रूपये इतका असेल अशी अपेक्षा आहे.
-
परभणी हा महाराष्ट्रातील एक अग्रणी कापूस उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्र राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत आहेत.
-
राज्यपाल: भगतसिंग कोश्यारी हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.
-
राज्य स्थापना वर्ष: १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती.
-
राजधानीचे ठिकाण: मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो.