• केरळ राज्यातील वेली पर्यटन गावामध्ये मुख्यमंत्री श्री. पिनाराई विजयन यांच्या हस्ते भारतातील पहिल्या सौर ऊर्जा आधारित लघु ट्रेनचे (Solar Energy-driven Miniature Train) अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर ट्रेन विहंगम स्थानावरील सुविधांसह विशेषत: मुलांसाठी आकर्षण बिंदू ठरू शकणारी आहे.

  • आंतरराष्ट्रीय मानकांच्या स्तरापर्यंत नेण्यासाठी एकूण ६० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद याकरिता करण्यात आलेली आहे.

केरळ राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्य दर्जा प्राप्त वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी केरळला राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: तिरुवनंतपूरम ही केरळ राज्याची सध्याची राजधानी आहे.

  • राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान हे केरळच्या राज्यपाल पदावर आहेत.

  • मुख्यमंत्री: पिनाराई विजयन हे सध्या केरळच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.