• शहराला एकल वापर केला जाणार्‍या प्लॅस्टिकपासून मुक्तता मिळवण्यासाठी मध्य प्रदेशातील इंदोर येथे अनोखी प्लॅस्टिक प्रीमियर लीग (Plastic Premier League - PPL) स्पर्धा खेळवण्यात येत आहे.

ठळक मुद्दे

  • स्वच्छतेसंदर्भात घेण्यात येणाऱ्या अभिनव प्रयत्नांसाठी इंदोर सुप्रसिध्द आहे.

  • आतापर्यंत ४ वेळा इंदोरला देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून गौरविण्यात आले आहे.

स्पर्धेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • प्लॅस्टिक प्रीमियर लीग स्पर्धेसाठी ४ संघ स्थापन करण्यात आलेले आहेत.

  • इंदोर महानगरपालिकेचे सध्याचे १९ विभाग या ४ संघात विभागण्यात आले आहेत.

  • संघाचा कर्णधार रेडिओ जॉकी स्पर्धेसाठी नागरिकांना त्यांच्या रेडिओ स्टेशन वरून जास्तीत जास्त प्लॅस्टिक देण्यास प्रोत्साहित करेल अशी अपेक्षा आहे.

  • सदर ४५ दिवसांच्या स्पर्धेत सर्वाधिक एकल-वापर करणारे प्लॅस्टिक गोळा करणारा संघ PPL करंडक विजेता बनेल.

मध्य प्रदेश बाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान हे सध्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: आनंदीबेन पटेल सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राज्यनिर्मिती वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: भोपाळ ही सध्या मध्य प्रदेशची राजधानी आहे.

  • राज्याची विशेषता: मध्य प्रदेश हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.