-
१४ वा आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव (International Children’s Film Festival - ICFF) बांगलादेशमधील ढाका येथे संपन्न झाला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर सांगता समारंभात विजेत्यांना एकूण १२ पुरस्कार प्रदान करण्यात आले.
-
बांगलादेश बाल फिल्म सोसायटीमार्फत (Children’s Film Society - CFS) आयोजित ७ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ३७ देशांतील १७९ चित्रपट विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले.
-
सदर महोत्सवात बांगलादेश व्यतिरिक्त भारत, अर्मेनिया, अमेरिका, यूके, आयर्लंड, जपान आणि चीन इ. देशांमधील चित्रपट दाखविण्यात आले.
-
डच चित्रपट जॅकी आणि ओपजेन (Jackie and Oopjen) ला 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म (Best International Feature Film)' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-
'माटी (Maati)' या बांगलादेशी चित्रपटाला 'यंग टॅलेंट अॅवॉर्ड (The Young Talent Award)' मिळाला.