• आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमार्फत (International Monetary Fund - IMF) ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकच्या (World Economic Outlook)’ अहवालानुसार २०२०-२१ सालामध्ये भारतीय अर्थव्यवस्था १०.३ टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • भारतीय अर्थव्यवस्था ४.५ टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज IMF द्वारे यापूर्वी वर्तविण्यात आला होता.

  • IMF मार्फत सद्य स्थितीवरून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की २०२१-२२ मध्ये भारताचा GDP ८.८ टक्क्यांनी वाढेल.

IMF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IMF म्हणजेच International Monetary Fund अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी होय.

  • स्थापना वर्ष: १९४५ साली IMF ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: वॉशिंग्टन, डीसी, युनायटेड स्टेट्स हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • व्यवस्थापकीय संचालक: क्रिस्टलिना जॉर्जिएवा या पदावर विराजमान आहेत.

  • सदस्य देश: IMF चे १८९ सदस्य देश आहेत.