-
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्याने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या (Pradhan Mantri Gram Sadak Yojana - PMGSY) अंमलबजावणीमध्ये अव्वल स्थान पटकाविले आहे.
ठळक मुद्दे
-
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत PMGSY कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत देशातील सर्वाधिक चांगली कामगिरी करणाऱ्या ३० जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
-
PMGSY अंतर्गत रस्ते तयार करण्यासाठी हिमाचल प्रदेशने राष्ट्रीय स्तरावर दुसरे स्थान प्राप्त केले आहे.
-
हिमाचल प्रदेशमधील आणखी ६ जिल्ह्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अव्वल ३० जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवले आहे.
हिमाचल प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी केंद्र शासित प्रदेश म्हणून स्थापना तर २५ जानेवारी १९७१ रोजी राज्यदर्जा प्राप्त झाला होता.
-
राजधानी: शिमला ही हिमाचल प्रदेशची उन्हाळी तर धरमशाला ही हिंवाळी राजधानी आहे.
-
राज्यपाल: बंदारू दत्तात्रेय हे सध्या राज्याच्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यमंत्री: जय राम ठाकूर हे सध्या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने हिमाचल प्रदेश राज्याचा देशात १७ व क्रमांक लागतो.